उपसभापती नीलम गोऱ्हे मोठा निर्णय घेणार
मुंबई (MH Legislative Council) : राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) हिंदू विरोधी वक्तव्यावरून राज्याच्या विधान परिषदेत (Legislative Council) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केलेल्या शिविगाळीवरून आज सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. सकाळी 11 वाजता विशेष बैठकीत राज्यपालांच्या अभी भाषणावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी कालच्या प्रकारावर चर्चा सुरू केली. साधारण त्यांचे एखाद मिनिटांचे भाषण झाल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी कालच्या प्रकारावर निश्चित निर्णय घेणारं असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या या सूचनेचा सत्ताधारी पक्षाने दुर्लक्ष केले व विरोधी पक्षनेत्यांच्या वर्तन अशोभनीय असल्याचे सांगितले. सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी जरी असलो तरी याविषयावर चर्चा होत नसेल तर कामकाज चालू देणार नाही असे दरेकर म्हणाले. यानंतर उपसभापती गोऱ्हे यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत थांबवले.
दुपारी 12 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा सभागृहात गोंधळ झाला. विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आली. नीलम गोऱ्हे यांनी कठोर निर्णय घेणार आहे याचा पुनरुच्चार केला. यावेळी अंबादास दानवे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी सदस्य तावातावाने बोलत होते. चिडलेले प्रसाद लाड सभागृहाने पुन्हा बघितले. आई बहिणी वरून शिवीगाळ सहन करणार नसल्याचे ते म्हणजे. (Legislative Council) गोंधळातच उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी कामकाज पुन्हा एकदा 1 तासासाठी तहकूब केले. नीलमताई अत्यंत निराश झालेल्या यावेळी दिसून आल्या. त्यांची देहबोली बरेच काही सांगून गेली. कामकाज तहकूब झाल्यानंतर सदस्य बंटी पाटील व शशिकांत शिंदे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले.