वसमत (Milk price) : सर्व वस्तूचे भाव वाढत आहेत पशुखाद्याचे दर वाढत आहेत मात्र दुधाचे दर वाढत नाही त्यामुळे दुधाचे दर वाढावेत. या मागण्यासाठी वसमतला दूधपुरवठा करणाऱ्या वसमत तालुक्यातील सर्व (Milk price) दूध उत्पादकांनी शहरातून फेरी मारून दुधाचे दर वाढवावेत अशी मागणी केली.
वसमत येथील ग्राहकांना (Milk price) दुध पुरवठा करणाऱ्या सर्व दूध उत्पादकांनी रविवारी शहरातून मोर्चा काढला. आसेगाव रोडवरील शिवाजी पवार यांच्या दूध डेरी पासून मोटर सायकल रॅली काढण्यात आली. दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी शहरातून घोषणा देत भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली. शिवाजी पवार यांच्या देवीसमोर रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी शिवाजी पवार ( दूध डेरी अध्यक्ष ) शिवम झुंजुर्डे , रतन जाधव ,सचिन पप्पडवार , गजानन पवार , सुदाम कोरडे ,बालाजी वाघमारे ,मधुकर लोखंडे ,गजानन जाधव , सुरज जगताप, अमोल चिंतडवाड , आदिनाथ जाधव , संजय जगताप , ज्ञानेश्वर बागल , नन्नू झुंझुरडे ,गोविंद झुझुरडे, गोवीद झुंजुर्डे ,बालाजी अडकिने , उत्तम पडोळे , श्याम भारती , दूध उत्पादक शेतकरी दूध पुरवठादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.