आष्टी पोलिसांची कामगिरी
आष्टी (Minor Girl kidnaping) : घरी कुणीही नसतांना अल्पवयिन मुलीस फुस लावून पळवून नेणार्या आरोपीस आष्टी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात जेरबंद केले आहे. वैष्णव गणपती मोटघरे रा जूनगाव ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर असे आरोपीचे नांव आहे.
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील पिडीत मुलीचे वडील २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कलर पेंट खरेदी करण्यासाठी आष्टी येथे गेले असता त्यांची अल्पवयीन मुलगी घरीच होती. या (Minor Girl kidnaping) दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या मुलीस फुस लावून पळवून नेले. मुलीचे वडील घरी आले असता त्यांना मुलगी घरी आढळून आली नाही. त्यांनी या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्राणहिता पोलीस मुख्यालयाचे अपर पोलीस अधीक्षक कार्तीक यांच्या आदेशानुसार अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाट यांनी त्वरित तपासकामी चमु तयार केली.
आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शना खाली, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड, पोलीस शिपाई सतीश गुडा, मपोशी पायल ताराम ,चापोशी राऊत, हवालदार सहारे यांच्या चमुने या गुन्ह्यात तांत्रिक तपास करून संशयित आरोपी यांचे मोबाईल लोकेशनच्या आधारे राजस्थान राज्यातील कोटा येथून पीडित मुलगी व आरोपी वैष्णव मोटघरे यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही आष्टी येथे आणण्यात आल्यानंतर आरोपी वैष्णव गणपती मोटघरे याला अटक करण्यात आली. या (Minor Girl kidnaping) गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याबाबत तपास आष्टी पोलीस करीत आहेत.