आ.बाळापूर/वारंगा फाटा (Minor girl molestion) : कळमनुरी तालुक्यातील येडसी तांडा येथील भोजाजी नाईक आश्रम शाळेत कार्यालयात ११ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिंनीचा करण्यात आला. या प्रकरणी आश्रम शाळेतील दोन शिक्षकांवर १५ ऑक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी पथकाने भेट दिली आरोपी अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येडशी तांडा भोजाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळेत १३ ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजता अल्पवयीन विद्यार्थिनीला तु जेवायला व माझ्या सोबत कार्यालयामध्ये चल म्हणून ऑफिसमध्ये नेउन तिचा विनयभंग केला. याबाबत आज सायंकाळी आरोपी क्रमांक एक पटवे पुर्ण नाव माहिती नाही व (Minor girl molestion) पिडीतीने घडलेल्या घटनेबाबत सांगितले असता त्यांनी सदरची माहिती कोणाला दिली नाही म्हणून जाधव दोघे आश्रमशाळा येडशीतांडा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, बिटप्रमुख शेख बाबरभाई, शिवाजी पवार, अतुल मस्के, प्रभाकर भोंग पोलीस पथकाने भेट दिली.