ॲट्रॉसिटी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
उदगीर (Girl sexually Assault) : उदगीर शहरालगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कूल शाळेत एका १६ वर्षीय अल्पवयीन अंध आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २ मार्च रोज रविवारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरोपीविरुद्ध ऑट्रासिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर शहरा लगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कूल या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका १६ वर्षीय अंध आदिवासी अल्पवयीन मुलीला आरोपीने ‘तुझ्या आईचा फोन आला आहे’, असे सांगून बोलावून घेवून २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलगी ही अनुसूचित जमातीची आहे असे माहीत असतानाही फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध मनास लज्जा वाटेल, असे (Girl sexually Assault) आरोपीने कृत्य केले. फिर्यादीच्या दोन मैत्रिणी सोबतही लज्जा वाटेल, असे कृत्य केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांनी जय हिंद पब्लिक स्कूल येथे जाऊन पीडित मुलींचा जबाब नोंदवून पीडित मुलींच्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मुरली बाजीराव देशमुख (वय ५६ वर्ष) यांच्यावर गुरनं. १०४/२५ कलम ७४,७५,(१) भारतीय न्याय संहिता सह कलम ७,८ पोक्सो सह कलम ३ (१),(डब्ल्यू),(ii),३ (२), (५अ) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.




