आमदार अमित सुभाषराव झनक यांना निवेदन!
रिसोड (Minority Students) : दिनांक 30 जून 2025 पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या द्वितीय (पात्रमाळी) अधिवेशनात अल्पसंख्याक विकास विभागाच्या (Department of Minority Development) अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था (MRTI)’ संदर्भातील अंमलबजावणीत झालेल्या दिरंगाईबाबत लक्षवेधी सूचना तारांकित प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी जमात ए इस्लामी हिंद रिसोडच्या वतीने रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित सुभाषराव झनक यांची दिनांक 28 जुन सकाळी त्यांचे मांगुळ झनक स्थित निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर करून मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी अल्पसंख्याक समाजाच्या सर्वागीणीकरणाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेत अल्पसंख्याक संशोधन प्रनिक्षण संस्था (MRTI) स्थापन करण्याम मान्यता दिली. ही संस्था अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना (Minority Students) शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि व्यावसायिक मंच उपलब्ध करून देणारी एक महत्वाची पायाभूत सुविधा ठरू शकते.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन!
राज्य शासनाने संस्वेसाठी 11 पदांची मंजूरी तसेच 6.25 कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला आहे. मात्र खेदाने नमूद करावे लागते की, आजच्या तारखेपर्यंत प्रत्यक्ष कार्यारंभ झालेले नाही. ना कार्यालय सुरू झाले आहे. ना अधिकारी-कर्मचारी नियुक्त झाले आहेत आणि ना योजनांची अंमलबजावणी आहे. यामुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती पोलिस व सैन्य भरती प्रशिक्षण कौशल्य विकास योजना, वसतीगृहे व निर्वाह भता अशा अनेक योजनांचा लाभ मिळू शकलेला नाही. राज्यातील बार्टी, सारधी, महाज्योती, अमृत टार्टिया संस्थांच्या धर्तीवर (MRTI) कार्यान्वित होणे गरजेचे असून, त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला देखीन समान संधी मिळेल. तरी आपल्यामार्फत पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) वाचीन मुद्द्यांवर लक्षवेधी सूचना तारांवित उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन (Statement) देताना जमाती इस्लामीचे वाशिम जिल्हाअध्यक्ष शेख वकार वसीम खान, आलिम अब्दुल्ला आदि उपस्थित होते.