जिल्हाधिकर्यांना तक्रार चौकशी व कारवाईची मागणी
मोहाडी (Hiwra Pandan road) : तालुक्यातील हिवरा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण खडीकरण रस्त्यात मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. काम कागदोपत्री दाखवून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे. गावात झालेल्या तीन (Hiwra Pandan road) पांदण रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. करीता सदर कामांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
मोहाडी तालुक्यातील अनेक गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्त्याच्या कामात मोठा गैरकारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकरण पुढे येत आहेत. हिवरा गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्त्याचे काम सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात करण्यात आले. कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या या पांदण रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मातीकाम प्रत्यक्षात झालेले नाही. ते केवळ कागदावरच दाखविण्यात आले.
विना रॉयल्टीचा पातळ मुरूम (Hiwra Pandan road) वापरून शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला. गावातील १५ ते २० व्यक्तींची खोटी नावे मस्टरमध्ये मजूर म्हणून दाखवून त्यांच्या नावे पैसे काढण्यात आले. गावातील सर्वच नागरिक रोजगार हमीच्या कामावर जात नाही. गावात ३५ ते ४० व्यक्ती अशी आहेत जी कामावर न जाणारी आहेत त्यांची नावे दाखवून त्यांच्या नावावर पैशांची उचल करण्यात आली.
गावातील काही लोक गावाबाहेर कामावर आहेत. काही नागरिक स्वत:च्या आधाराने उभी राहू शकत नाही अशा लोकांची नावे रोजगार हमीच्या कामावर दाखवून त्यांच्या नावे पैसे काढण्यात आले. या प्रकारामुळे शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्यामुळे या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, तांत्रिक सहायक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून अपहार झालेली संपूर्ण रक्कम संबंधित जबाबदाराकडून वसूल करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी किशोर रामटेके आणि गावकर्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
बाहेरगावी राहणार्यांची नावे
हिवरा येथील झालेल्या रोजगार हमीच्या कामात अनेक बोगस मजुरांची नावे दाखविण्यात आली. यात बाहेरगावी विविध कामे करत असलेल्या व्यक्तींची नावे ऑनलाईन हजेरीपटावर दाखविण्यात आली असून त्यांच्या नावे पैशांची उचल करण्यात आली. या (Hiwra Pandan road) ठिकाणी घोटाळे बहादुरांनी नवीन शक्कल लढवून शासनाच्या निधीचा अपहार केला आहे.
एक मजूर दोन कामावर
तालुक्यात रोहयोच्या कामात कसलीही भीती न बाळगता स्वत:च्या मनमर्जीने कामे करण्यात आली आहेत. जी व्यक्ती कधीही कामावर जात नाही अशाही व्यक्तीच्या नावे पैसे काढण्यात आले आहेत. काही व्यक्ती दुसर्या ठिकाणाच्या कामावर रुजू असतानाही त्यांची नावे रोजगार हमीच्या कामावर दाखविण्यात आले. काही मजुर आपल्या स्थायी कामावर रुजू दिसत असून त्याच दिवशी रोहयोच्या कामावरही उपस्थिती दिसत आहे. त्यामुळे एकाच वेळी एक मजूर दोन कामावर दाखविल्याने शासनाची दिशाभूल करून पैसे हडपण्याचा प्रयत्न झाले आहे.
ह्या कामात गैरकारभार
हिवरा येथे रोजगार हमी योजने अंतर्गत (Hiwra Pandan road) पांदन रस्त्याच्या कामात गैरकारभार झाल्याचे आरोप होत आहेत. यात तुमसर रामटेक रोड ते नामदेव शेंडे यांच्या शेतापर्यंत, तुमसर-रामटेक रोड ते ताराचंद पुडके यांच्या शेतापर्यंत, तुमसर-रामटेक रोड ते प्रल्हाद लोंढे यांच्या शेतापर्यंत या तीन पांदण रस्त्याचा समावेश आहे.