दसऱ्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांची भेट घेण्याचा निर्णय!
बार्शीटाकळी (MLA Amol Mitkari) : राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना, बार्शीटाकळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे विधान परिषदेचे सदस्य तथा आमदार अमोल मिटकरी यांच्या वागणुकीला व कार्यप्रणालीला कंटाळलेले असल्याचे एका सभेतून उघड झाले आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील शासकीय (Govt) विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एक संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबरला पार पडली. सदर बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बुद्रुजमा तसेच विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी हे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला आमंत्रित करीत नाहीत. आमदार अमोल मिटकरी यांना पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते (Activists) हे त्यांना मोबाईल वरून फोन करण्याचा प्रयत्न करत असताना ते फोन उचलत नाहीत, तसेच त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेटी करिता गेले तर ते दोन-तीन तास बसवून ठेवतात परंतु भेटत नाहीत. नंतर त्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, आपल्या सोबत माननीय दादासाहेब किंवा अमोल मिटकरी भेटू इच्छित नाहीत.
राजकीय पदाची गुरमी चढली असून पक्ष संघटनेच्या दृष्टीने त्यांची वागणूक व कार्य प्रणाली हे योग्य नाही!
अशाप्रकारे त्यांना राजकीय पदाची गुरमी चढली असून, पक्ष संघटनेच्या दृष्टीने त्यांची वागणूक व कार्य प्रणाली हे योग्य नाही. त्यामुळे पक्ष संगटन, जनतेची कामे, विकासात्मक कामे व जनतेच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. अशा अनेक पक्षाचा विस्तार कसा होणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भातपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती कथन केल्या जाईल. अशा प्रकारचा निर्णय सदर बैठकीत झाला असल्याची माहिती संबंधितांनी दिली. सदर बैठकीला बार्शीटाकळी तालुक्यातील व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाचे संस्थापक सदस्य, तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनोद थुटे, बार्शीटाकळी पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन म्हैसने, माजी तालुकाध्यक्ष तथा ग्राम मंडळाचे अध्यक्ष वसंत जाधव, खरेदी-विक्रीचे संचालक तथा ग्रामपंचायत महानचे सरपंच सुनील ढाकोल कार , माजी सभापती प्रल्हाद खुळे, सोसायटीचे अध्यक्ष गोपाल मांगुळकर, धनराज जवके, सुधाकर नीलखन, प्रकाश माणिकराव, चक्रधर राऊत, रामधन जाधव, रमेश राठोड, दिनेश चव्हाण, दत्ता पाटील, अजय लावंड, उमेश राठोड, अमोल जाधव, के एस राठोड, नारायण मंजुळकर, साहेबराव जाधव, दीपक वराडे, हरी ओम काळे, आयर्न सिरसागर, सिताराम पवार, सरदार राठोड, अजून आडे, उमेश राठोड, आकाश माणिकराव, चक्रधर राऊत, रामदास नवलकर, हुनसिंग राठोड, नाना पाटील, श्याम राठोड, चीन ठाकरे, अकबर भाई, रामेश्वर नावकर, रामेश्वर पवार, कैलास ठाकरे, गजानन ठाकरे, असे पक्षाचे जिल्हा, तालुका स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संपर्क साधला असता वृत्तलेपर्यंत संपर्क होऊ शकला नाही.