वसमत येथील युवा संवाद मेळाव्यात आमदार रोहित पाटील गरजले
वसमत/हिंगोली (Youth Sanvad melava) : भाजप व महायुती सरकारला महाराष्ट्राचे नव्हे तर गुजरातचे भले करायचे होते महाराष्ट्रातून तब्बल दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातला गेली आहे त्यामुळे बेकरांना काम मिळणे अवघड झाले असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहितदादा पवार यांनी केले वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित युवासंवाद मेळाव्यात ते बोलत होते या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
वसमत येथील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या युवा संवाद मेळाव्यासाठी युवक,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे युवनेते आमदार रोहितदादा पवार ,रोहितदादा आर आर पाटील , माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी आमदार पंडितराव देशमुख तालुकाध्यक्ष दौलत हुंबाड, राजेश पाटील इंगोले, विनोद झंवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संवाद म ळाव्यात माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी आमदार रोहित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत महायुती सरकारला धारेवर धरले लोकसभेमध्ये जशी ताकद दाखवली तशीच विधानसभेतही ताकत दाखवावी असे आवाहन करून विधानसभेत माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करणार नाही तर चांगल्या पद्धतीने तिची अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव चांगला मिळाला पाहिजे युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे महिला भगिनी सुरक्षित राहिला पाहिजेत याकडेही प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहितदादा आर आर पाटील यांनी जोरदार भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी हे चिन्ह घराघरात पोहोचवावे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना विक्रम मताने विजय करावे असे आवाहन केले. युवा संवाद मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दौलत हुंबाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मेळाव्यासाठी प्रचंड संख्येने तरुण कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दौलत हुंबाड यांच्या मार्गदर्शनाखाली आसेगाव येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली वसमत मध्ये आल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली कृष्णा गार्डन मंगल कार्यालयाकडे रवाना झाली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने दुचाकीस्वार सहभागी झाले होते रॅलीत आमदार रोहित पवार ,रोहित पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते या रॅलीचे पुढे मेळाव्यात रूपांतर झाले.