दर्जेदार आरोग्य सुविधासाठी वाट्टेल तेवढा निधी आणणार!
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : मुंबई आमदार निवास कॅन्टीन मधील मारहाण प्रकरणानंतर अनेक माध्यमांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधांचा मुद्दा उपस्थित करून, आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.. मात्र मुंबईवरून परतताच पहिल्यांदा बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय गाठत तिथली झाडाझडती आ. गायकवाड यांनी घेतली. रुग्णालय परिसरातील पार्किंग, डिसमेंटल एरिया, नवीन इमारतीचे काम, डॉक्टरांची उपस्थिती आणि व्यवस्थापन याचा सविस्तर आढावा त्यांनी घेऊन इथली स्वच्छता आणि भोजनाच्या संदर्भात कुठलीही तक्रार येता कामा नये.. असे निर्देश देत दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी वाट्टेल तेवढा निधी शासनाकडून खेचून आणण्याची ग्वाही दिली.
वादाच्या गदारोळानंतर आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) आज शुक्रवार ११ जुलै रोजी बुलढाणा येथे परतले, शहरात येताच त्यांनी पहिल्यांदा गाठले ते जिल्हा सामान्य रुग्णालय. रुग्णालय परिसरातील पार्किंग, डिसमेंटल एरिया, नवीन इमारतीचे काम, डॉक्टरांची उपस्थिती आणि व्यवस्थापन याचा सविस्तर आढावा त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार व डॉ. भुसारी यांच्याकडून घेत त्यांच्यासोबत चर्चा करून रुग्णालयातील समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी आ. गायकवाड यांनी अनेक उपाययोजना सुचवण्यात.
सुसज्ज आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून दिला जाईल, असे (MLA Sanjay Gaikwad) आमदारांनी स्पष्ट केले. “जनतेला दर्जेदार उपचार मिळणं हा हक्क आहे आणि तो हक्क देणं ही आमची जबाबदारी आहे,” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.