आ. संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश
– निवासी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाचा मार्ग मोकळा
– निवासी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाचा मार्ग मोकळा
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : शहरापासून जवळच असलेल्या कोलवड येथील अनु,जाती व (Kolwad Nivasi School) नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेतील कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला होता. मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धारला असता निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या पुढाकारातून विविध विकास कामे पूर्णत्वास गेली असून, अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. असा शहरापासून जवळ असलेल्या कोलवड येथील अनु, जाती, नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला होता. मात्र, मतदार संघातील विकास कामांच्या बाबतीत सदैव अग्रेसर असणारे आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी खितपत पडलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या होणारी गैरसोय पाहता पावसाळी विधानसभा अधिवेशानत औचित्याचा मुद्दा मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.
इतका निधी मंजूर
अनु, जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, (Kolwad Nivasi School) कोलवड येथील शाळेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या पुढाकाराने अंदाजित 6.67 कोटींच्या निधीला मंजूरात मिळाली आहे.




