हिंगोली (MLA Santosh Bangar) : शहरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात आमदार संतोष बांगर व शिवसेनेचे हिंगोली नगर परिषदेमधील गटनेते तथा भावी नगराध्यक्ष श्रीराम बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या हस्ते नर्मदेशंवराची आरती करण्यात आली.
हिंगोली शहरातील बगडिया ऑइल इंडस्ट्रीज रमेश शेठ बगडिया यांच्या निवासस्थानी असलेल्या नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज संध्याकाळी सात वाजता आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) तसेच त्यांचे बंधू भावी नगराध्यक्ष श्रीराम बांगर यांच्या हस्ते नर्मदेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी रमेशचंद बगडिया ,सुनील बगडिया ,आशुतोष बगडिया , श्रीराम बांगर,अशोक अग्रवाल, नगरसेवक गणेश बांगर ,राम कदम, गोपाल अग्रवाल, कांता गुंडेवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष भावी भक्त उपस्थित होते.
यावेळी रमेशचंद बगडिया यांच्या कुटुंबीयांच्या वतीने नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज नर्मदेश्वर महादेवाची तिरंगा ध्वज अशी प्रतिकात्मक पानाफुलांची सजावट करण्यात आली होती.