पिक पाहणी प्रयोगासाठी चिखली शिवारात
आखाडा बाळापूर (MLA Santosh Bangar) : कळमनुरी तालुक्यातील अतिवृष्टी व कयाधू नदीच्या पुराने अतोनात नुकसान झालेल्या चिखली शिवारात आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) , जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) हे सोयाबीन पीक कापणी प्रयोगासाठी चिखल तुडवत शेतात पोहोचले. यावेळी विविध अधिकारी कर्मचारी बरोबर शेतकरी उपस्थित होते.
यंदा दोन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे व पुर तसेच पिके पाण्याखाली राहून अतोनात पिकाच नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आशावेळी आणेवारी काढण्यासाठी पिक प्रयोगासाठी कळमनुरी मतदारसंघाचे (MLA Santosh Bangar) आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतः चिखली शिवार गाठल अतीपावसामुळ शेतशिवारात चिखल व पाणी आहे आशावेळी आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) स्वतः ट्रक्टर चालवत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी सोबत शेत गाठून नंतर चिखल तुडवत चिखली गट क्रमांक 991/1 शेतकरी नागोराव भाउराव चव्हाण शेतात पिक कापणी प्रयोग करण्यात आला बिल्ड वजन 1.150 kg,पैसे 0.70, 0.05 आर. आले.
यावेळी आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) , जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) सह जिल्हा कृषी अधिक्षक राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी के.एम.जाधव, तहसीलदार जिवककुमार कांबळे, मंडळ अधिकारी आनंद काकडे, तलाठी शिरसाट, ग्रामसेवक स्नेहल बकरे,कृषी सहाय्यक संतोष वाघमारे, भारतीय कृषीविमा कंपनीचे संतोष तायडे, ज्ञानेश्वर व्यवहारे,संतोष भाकरे सोयाबीन पीक कापणी प्रयोगासाठी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा: आ. बांगर
यंदा दोन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे, अतिवृष्टी व कयाधू या मोठ्या नदीबरोबर इतर नदीनाले पुरान तसेच पिके पाण्याखाली राहून संपूर्ण हंगाम गेला पिकांच अतोनात नुकसान झाले अशा संकटसमयी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी व इतर शेतीआवश्यक सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा करत आसल्याचे आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.