हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : भाजपतर्फे शनिवारी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आ. तान्हाजी मुटकुळे यांना अचानक भोवळ आल्याने त्यांना हिंगोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखविलेल्या शौर्याबद्दल भाजपतर्फे १७ मे रोजी तिरंगा रॅलीचे (Tiranga Rally) आयोजन हिंगोलीत केले होते. या रॅलीमध्ये ना. मेघनाताई बोर्डीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule), राकाँचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.
महात्मा गांधी चौकातून शहरातील प्रमुख मार्गावरून या (Tiranga Rally) रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आ. तान्हाजी मुटकुळे यांना अचानक भोवळ आल्याने ते खाली बसले. आजूबाजूला असलेल्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांना तात्काळ हिंगोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आ. मुटकुळेंवर उपचार सुरू असुन त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना भोवळ आल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. तसेच त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही सांगण्यात आले.