भाजीमंडईत स्वच्छतेबाबत आ. मुटकुळेंनी दिल्या सुचना
नवीन भाजी मंडई व लीलाव बाजारासाठी आमदार मुटकुळे सकारात्मक
हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : शहरातील भाजीमंडईत गुरुवारी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी भेट देवून पाहणी केली असता तेथील अस्वच्छतेबाबत त्यांनी नगर पालिकेच्या कर्मचार्याला सुचना दिल्या. यावेळी नगरसेवक अ.माबुद बागवान यांनी नविन भाजामंडई व लिलाव बाजारासाठी मागणी केली असता आ. मुटकुळेंनी सकारात्मकता दर्शविली.
हिंगोली शहरामध्ये भाजीमंडई असून मध्यंतरी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी या भागातील विकास करण्या करीता मोठा निधी दिला होता. ग्रामीण भागातून अनेक भाजी विक्रेते या भाजीमंडईत येतात. तसेच याच ठिकाणी भाजी व फळ विक्रीचा लिलाव केला जातो. दिवसेंदिवस जागा अपुरी पडत आहे. तसेच भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. त्या अनुषंंगाने ७ ऑगस्ट रोजी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी भाजी मंडईत भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नगरसेवक अ. माबुद बागवान, अॅड. राजेश गोटे, नगरसेवक उमेश गुठ्ठे, प्रशांत सोनी, हमीद प्यारेवाले, मधु अग्रवाल, बाबा घुगे, निनाजी कांडेलकर, रजनिश पुरोहित, राजेश अग्रवाल, अक्षय लव्हाळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ. मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी भाजीमंडईतील अस्वच्छता पाहून तात्काळ स्वच्छतेकडे लक्ष घालण्याच्या सुचना स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांना दिल्या. या प्रसंगी भाजीमंडईतील व्यवसायीकांशी आ. मुटकुळे यांनी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणुन घेतल्या. यानंतर नगरसेवक अ. माबुद बागवान यांनी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे नविन भाजीमंडई व फळ विक्रीसह लिलाव बाजाराकरीता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता आ. मुटकुळे यांनी तात्काळ सहमती दर्शवली.
त्याच प्रमाणे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी बोलताना या नविन भाजीमंडई व फळ विक्री आणि लिलाव बाजाराकरीता व्यवसायीकांना जागा उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.