व्यापाऱ्यांचा गंगाखेड बंद मागे
परभणी/गंगाखेड (Mobile Shop Attack case) : मोबाईल शॉपी मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील दोघांना सोमवार ७ एप्रिल रोजी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवार ९ एप्रिलपर्यंत (Mobile Shop Attack case) पोलीस कोठडी सुनावली असुन व्यापाऱ्यांच्या वतीने उद्या पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मातोश्री मोबाईल शॉपी वरून घेतलेला नवा मोबॉईल अवघ्या चार महिन्यात खराब झाल्यामुळे तालुक्यातील झोला येथील नितीन मुंडे, कृष्णा मुंडे, नारायण आंधळे, सुनिल आंधळे व अजय मुरकुटे आदींनी दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान मोबाईल शॉपीवर येऊन दुकान मालकास शिवीगाळ व दमदाटी करून एक मोबाईल बळजबरीने नेला होता.
ही बाब मोबाईल शॉपी चालकाने झोला येथील सरपंच यांना सांगितल्याने रात्री ७ वाजेच्या सुमारास परत दुकानावर आलेल्या (Mobile Shop Attack case) वरील आरोपींनी तु सरपंचाला फोन का केला म्हणत मोबाईल शॉपी चालकाच्या भावाच्या अंगावर व दुकानात पेट्रोल टाकून दुकान पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद नितीन बचाटे यांनी दिल्यावरून विविध कलमान्वये एकुण पाच जणांवर (Mobile Shop Attack case) गुन्हा दाखल करत पोलिसांनी नारायण आंधळे व अजय मुरकुटे या दोघांना ताब्यात घेऊन अटक केले होते.
या (Mobile Shop Attack case) गुन्ह्यातील फरार तीन आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी करत शहरातील व्यापाऱ्यांनी परिविक्षाधीन सहा. पो. अ. ऋषिकेश शिंदे यांना शनिवार ५ एप्रिल रोजी निवेदन सादर करून उद्या मंगळवार ८ एप्रिल रोजी गंगाखेड बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील पोलीस अधिकारी व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर आदींच्या पथकाने फरार असलेल्या तिघांपैकी नितीन मुंडे व कृष्णा मुंडे या दोघांना रविवार ६ एप्रिल रोजी अटक करून सोमवार ७ एप्रिल रोजी गंगाखेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना ही बुधवार ९ एप्रिल रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
उद्याचा गंगाखेड बंद मागे
मोबाईल शॉपी हल्ला प्रकरणातील दोघांना रविवारी अटक पोलिसांनी अटक केल्याने व या गुन्ह्यातील एकुण चार (Mobile Shop Attack case) आरोपींना अटक करण्यात आल्याचे समजताच फरार आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी करणाऱ्या व्यापारी महासंघ व मोबाईल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन सहा. पो. अ. ऋषिकेश शिंदे यांची भेट घेऊन आभार मानले तर उद्या मंगळवार ८ एप्रिल रोजी पुकारलेला गंगाखेड बंद मागे घेतल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी यांनी दिली आहे.