कळंब (ST Bus Accident) : तालुक्यातील पोटगव्हाण येथिल युवक समिर दशरथ उईके (२०) या आदिवासी मुलाला आदिवासी दिनीच एसटी बस क्रमांक एम एच ४०/सीएम ५२८२ च्या चालकाने समोरासमोर (ST Bus Accident) मोटरसायकल क्रमांक एम एच २९/सीएच ४६०९ ला जबर धडक दिल्याने रक्ताच्या थारोळ्यात जागीच ठार झाल्याची घटना घडली.
विज पुरवठा खंडीत राहात असल्याने पिठगिरणी बंद असल्या की नांझा गावाला दळण दळण्यासाठी पिठ गिरणीवर यावे लागते अशाच प्रकारे जागतिक आदिवासी दिनी आदिवासी युवक समिर उईके पोटगव्हाण येथुन नांझा येथे दळण घेऊन पिठगिरणीवर येत असता नांझा-पोटगव्हाण एस टी बसने खडकी फाट्याजवळ समोसमोर मोटरसायकलला जबर धडक (ST Bus Accident) दिल्याने सम्यक रोडवर पडून रक्ताचे पाट वाहून जागीच ठार झाला.
विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे पोटगव्हाण दत्तक ग्राम असून गावात नेहमीच विज पुरठा खंडीत राहतो कुणी राजकीय नेता, अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांना यातना भोगाव्या लागतात. मृतकचे वडील दशरथ गोविंदा उईके यांनी कळंब पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.