ऑनलाईन गेमिंगचे नियमन व प्रोत्साहन विधेयक, २०२५’ लोकसभेत मंजूर!
गडचिरोली (MP Namdev Kirsan) : ऑनलाईन गेमिंग संदर्भात खा. डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाची केंद्र सरकारने दखल घेऊन ऑनलाईन गेमिंगचे नियमन व प्रोत्साहन विधेयक, २०२५’ लोकसभेत मंजूर केले आहे. या ऑनलाईन गेमिंग मध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने लहान मुले व मोठी माणसे मानसिक रित्या आजारी होऊन आत्महत्या करत असल्याने, या संबंधात शासनाला (Government) माहिती आहे का? , ऑनलाईन गेमिंगमुळे लहान मुलांचे होत असलेल्या शारीरिक नुकसान व ऑनलाईन गेमिंग मध्ये आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणुन सरकारची भूमिका काय आहे? असा प्रश्न खा. डॉ. नामदेव किरसान यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत उपस्थित करत केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग संदर्भात कठोर कायदा करण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रश्नाची दखल घेत केंद्र शासनाने नुकतेच ‘ऑनलाईन गेमिंगचे नियमन व प्रोत्साहन विधेयक, २०२५’ कायदा तयार केला असून सदर कायदा लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.
सुरक्षित व जबाबदार इंटरनेटसाठी महत्त्वपूर्ण पाऊल!
या कायद्यामुळे ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून होणार्या फसवणुकीवर आळा बसेल, तरुण व बालकांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण होईल तसेच सुरक्षित व जबाबदार इंटरनेटसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, असा विश्वास खा. डॉ. किरसान यांनी व्यक्त केला आहे.