महिलांचा अनादर करणाऱ्या महायुती सरकारला आता हद्दपार करायचे : खासदार प्रणितीताई शिंदे
चिखली (MP Praniti Shinde) : यंदाच्या लोकसभेत सत्ताधारी पक्षाने साम दाम दंडासोबत ईडी, दडपशाहीचा अवलंब केला. लोकसभेच्या वेळेस सत्ताधाऱ्यांनी साड्या मध्ये लपवून पैसे वाटप केले. तेव्हा कुठे होते इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट आणि इलेक्शन कमिशन असा सवाल करत खा. प्रणिती शिंदे (MP Praniti Shinde) म्हणाल्या की, भाजपाच्या काळात महिलांवरील अत्याचारात लक्ष्यणीय वाढ झाली आहे. निवडणूक जवळ आल्या आल्या लाडकी बहीण योजना आणली. मागच्या तीन वर्षात का बर ही योजना सुरू केली नाही? यावरून हे सिद्ध होते की निवडणुकीपर्यंत आमिष दाखवण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेची ही निवडणूक महिल्यांच्या आत्मसन्मानाची असून जे सरकार शेतकऱ्यांना भाव देत नाही, महिलांचा सन्मान राखत नाही त्या सरकारला यंदा आपल्याला हद्दपार करयाचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि चिखली विधानसभेसाठी राहुलभाऊ बोंद्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही खा. प्रणिती शिंदे (MP Praniti Shinde) यांनी केले.
चिखली विधानसभा मतदरासंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे (Rahul Bondre) यांच्या प्रचारार्थ रविवारी १० नोव्हेंबर रोजी आयोजित महालक्ष्मी सन्मान मेळाव्यात खा. प्रणिती ताई शिंदे बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आम्हाला पैसे न,को आम्हाला आमच्या मुलींना संरक्षण पाहिजे. आम्हाला प्रतिष्ठा पाहिजे, आम्हाला आदर सन्मान पाहिजे. भाजपाच्या काळात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आज मुलगी शाळेत गेल्यावर घरी येईपर्यंत आई-वडिलांच्या मनात धास्ती असते, का तर चार वर्षाच्या लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहेत. बदलापूर मधील शाळेत चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाला त्या शाळेचे संस्थाचालक भारतीय जनता पक्षाचे होते. त्याच्यामुळे त्यांना पाठीशी घातले गेले. अशा राक्षसी मानसिकतेचे भारतीय जनता पक्षाचे लोक असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. यावेळी शिव सेना नेत प्रा-नरेंद्र खेडेक, माजी आमदार सौ- रेखाताई खेडेकर, ज्योतीताई खेडेकर, अॅड-सौ- वृषालीताई बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसच्या सभेला जाणाऱ्या महिलांवर दमदाटी
काल परवाच एक भाजपचा नेता म्हणाला की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या सभेला जात असतील तर अशा महिलांचे फोटो काढा, मी त्यांची ‘व्यवस्था’ लावतो. व्यवस्था म्हणजे काय? पुन्हा अत्याचार, पुन्हा बलात्कार, पुन्हा शोषण करणार का ?भाजपची मुळात मानसिकताच महिला विरोधी आहे, चिखलीतही काँग्रेसच्या सभेला जाणाऱ्या महिलांवर दमदाटी होत असल्याचे खा. प्रणिती शिंदे (MP Praniti Shinde) यांनी सांगितले.
संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेतून बदलून टाका : राहुलभाऊ बोंद्रे
“आम्हाला संविधान बदलून टाकायचे आहे”, असे अनेक भाजपच्या नेत्यांनी खुलेआम बोलून दाखवले आहे. भाजपला संविधान बदलून मनुस्मृती आणायची आहे. जर मनुवादाचे राज्य आले तर सर्वात पहिला आघात महिलांवर होईल, महिलांना चूल आणि मूल या चौकटीत बंद केले जाईल त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईल, त्यामुळे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेतून बदलून टाका असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मविआचे उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे (Rahul Bondre) म्हणाले.
चिखलीच्या विद्यमान आमदार या एक महिला आहेत. मात्र महिला असूनही त्यांनी चिखली मतदारसंघातील महिलांसाठी काहीच केले नाही. आज सगळीकडे दारूचे गुत्ते, वरली-मटक्याचे साम्राज्य पसरलेले आहेत त्याच्यामुळे महिलांचे संसार उध्वस्त होतात. येथील आमदाराचे पती गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसांचे खाजगी सचिव असून देखील एकाही गावातली दारू या स्थानिक आमदारांनी बंद केली नसल्याची खंत राहुलभाऊ बोंद्रे (Rahul Bondre) यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी कॉग्रेस व महाविकास आघाडीतील सर्व ब्लॉक अध्यक्ष, विविध फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया हजारोच्या संख्येने उपस्थितीत होते.




