परभणी (Parbhani) :- महावितरणच्या मुख्य कार्यालया मार्फत परभणी येथे कार्यरत असलेले परभणी विभाग – २ चे कार्यालय सेलू येथे स्थलांतरीत करण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पाठपूरावा केल्यामुळे मंजूरी देण्यात आली. या बाबतचे आदेश महावितरण मुख्य महाव्यवस्थापक यांनी पारित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. उर्जा विभागाचे सदर विभागीय कार्यालय सेलू येथे स्थलांतर करत मतदारसंघातील जनतेला मुख्यमंत्री यांनी मोठा दिलासा दिला आहे.
सेलू विभाग असे नामांतर
सेलू व परिसरातील सर्व विज ग्राहकांना त्यांच्या कामानिमित्त विभागीय कार्यालय परभणी येथे जावे लागायचे त्यामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सेलू येथे महावितरणचे विभागीय कार्यालय असावे अशी लोकांची मागणी होती. सदर मागणी ना.मेघना बोर्डीकर यांनी पूर्ण केली आहे. सेलू विभागा अंतर्गत जिंतूर उपविभाग, सेलू उपविभाग, मानवत उपविभाग, पाथरी उपविभाग, गंगाखेड उपविभाग यांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढे विज ग्राहकांना सेलू येथून सर्व सुविधा मिळणार असल्याने सर्व सामान्य लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.