हिंगोली (Asha Worker Morcha) : महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघ आणि कृति समितीच्या वतीने अनेक मागण्या प्रलंबित असल्याने त्या तात्काळ मंजूर कराव्यात यासाठी महाराष्ट्राचे राज्य आशा – प्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने १० ऑक्टोंबरला मुंबई आजाद मैदानावर मोर्चा काढून निर्दशन करण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख व राज्य संघटक दत्ता देशमुख यांनी केले आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे ३५०० पेक्षा अधिक गट प्रवर्तक व ७० हजारापेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आरोग्य विभागाचा कना म्हणुन त्यांना संबोधले जाते. (Asha Worker Morcha) गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचा प्रपंच त्यांच्या मानधनावर अवलंबून असताना मे, जून, जुलै, ऑगस्ट २०२५ या चार महिन्याचे मानधन त्यांना अद्याप वाटप झाले नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ेयेऊन ठेपली आहे. चार महिने मानधन न मिळाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चार महिन्याचे थकीत मानधन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या खात्यात तात्काळ जमा करून यापुढे केंद्र व राज्य निधीतून देण्यात येणारे मानधन एकत्रित व दरमहा पाच तारखेपर्यंत देण्यात यावे. गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांच्या मागण्यांमध्ये गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांचे दरमहा पाच तारखेपर्यंत केंद्र व राज्य शासनाचे एकत्रित व नियमित दरमहा मानधन देण्यात यावे. (Asha Worker Morcha) गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांना मातृ अॅप वर ऑनलाईन कामे करण्याची सक्ती करण्यात येत आहे. परंतु गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकाना शासनाने मोबाईल फोन, सिमकार्ड, व डाटा पॅक दिलेला नाही. गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांकडे स्वतःचे अत्याधुनीक अॅन्ड्रॉईड ५ जी मोबाईल फोन नाहीत.
तेव्हा जोपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांना ऑनलाईन कामे करण्यासाठी अत्याधुनीक अॅन्ड्रॉईड ५ जी मोबाईल फोन, सिम कार्ड व वर्षभर पुरेल एवढा डाटा पॅक दिला जात नाही, तोपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका कोणत्याही प्रकारचे ऑन-लाईन कामे मातृ अॅपवर करणार नाहीत. १ ऑक्टोंबर २०२५ पासुन मातृ अॅप व ऑनलाईन कामावार गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांचा बहिष्कार राहील. अंगणवाडी सेविकांच्या धर्तीवर गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांना पाच हजार रुपये दिवाळी भेट दिवाळीपुर्वी देण्यात यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचारी व गटप्रवर्तक यांचे काम एकसमान आहे.
परंतु गटप्रवर्तकांचा समावेश कंत्राटी कर्मचार्यामध्ये करण्यात आला नाही. त्यांना दौर्यावर आधारीत मोबदला मिळतो. त्यांना मिळणारा मोबदला बहुतांश प्रवासावर खर्च होतो. त्यांच्या प्रपंचासाठी हातात रक्कम शिल्लक राहात नाही. या (Asha Worker Morcha) बाबीचा विचार करुन त्यांना शासकीय कर्मचार्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचार्यांना दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत त्यांचा कंत्राटी कर्मचार्यामध्ये समावेश करुन कंत्राटी कर्मचार्यांना ५ ऑक्टोंबर २०२० पासुन लागु करण्यात आलेली नवीन वेतनश्रेणी गटप्रवर्तकांना लागु करावी.
गटप्रवर्तकांची कायम कर्मचारी म्हणुन नेमणुक करेपर्यंत दरमहा ३५ हजार रु. किमान वेतन लागु करण्यात येऊन त्यांना सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावे. आशा स्वंयसेविकांना आयुष्यमान कार्ड काढण्याची सक्ती करु नये. ६० वर्षे पुर्ण झालेल्या आशा स्वंयसेविकांना सेवानिवृत्त करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. (Asha Worker Morcha) आत्ता पर्यंत इमाने इतबारे काम करुन सेवानिवृत्त झाल्यावर आशा स्वंयसेविकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याचा विचार करुन आशा स्वंयसेविकांना निर्वाह भत्ता म्हणुन दरमहा ५ हजार रुपये देण्यात यावेत.
जोपर्यंत निर्वाह भत्ता लागु केला जात नाही तोपर्यंत आशा स्वयंसेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे ठेवण्यात यावे. आशा स्वयंसेविकांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा मागील दोन वर्षाचा मोबदला देण्यात आला नाही.तो देण्यात यावा. आशा स्वंयसेविका आरोग्य विभागाचा कणा आहेत. त्यांना रात्री-बेरात्री काम करावे लागते. त्यांची नियुक्ती व सेवाशतीचे नियम ठरविण्यात आले आहेत. म्हणुन आशा स्वंयसेविकांना शासकीय सेवेत कायम करुन चतुर्थ श्रेणीचे वेतन देण्यात यावे. जोपर्यंत चतुर्थ श्रेणी लागू केली जात नाही, तोपर्यंत आशा स्वंयसेविकांना दरमहा २५००० रुपये मानधन देण्यात यावे.
गटप्रवर्तकांना आशा स्वंयसेविका प्रमाणे आरोग्य वर्धिनीचा प्रोत्साहना भत्ता देण्यात यावा. (Asha Worker Morcha) गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांना शासन नियमानुसार भरपगारी प्रसुती रजा देण्यात यावी, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांना आजारपणाची भरपगारी रजा देण्यात यावी. गटप्रवर्तकांना बायोमॅट्रीकची सक्ती करण्यात येवु नये, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांना शासनाने ठरवुन दिलेले कर्तव्य व जबाबदार्या व्यतिरिक्त इतर कोणतेही कामे देण्यात येवु नये, विना मोबदला आशा स्वंयसेविकांना कामे सांगण्यात येवु नयेत, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांना मोबदला चिठठी देण्याचे आदेश मा.आयुक्तांचे असतानासुदवा मोबदला चिठठी दिली जान नाही. तेव्हा याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
आशा स्वंयसेविकांना जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रुग्ण घेवुन गेल्यास आणि तिथे मुक्काम पडल्यास आशांना मुक्कामासाठी आशा कक्ष स्थापन करण्याच्या आयुक्तांचे आदेश असताना सुध्दा याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तरी याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.गटप्रवर्तक व (Asha Worker Morcha) आशा स्वंयसेविकांना अंगणवाडी कर्मचार्याप्रमाणे दरवर्षी किरकोळ २० रजा सार्वजनिक १२ सुटटया देण्यात याव्यात. नागरी क्षेत्रात कार्यरत आशा स्वंयसेविकांकरीता सेवा शर्तीचे नियम तयार करण्यात यावे. गटप्रवर्तकांच्या सेवानिवृत्तीचे वय निश्चित करण्यात यावे.
महानगरपालिकेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा स्वंयसेविकांना दररोज सक्तीने आरोग्य केंद्राव हजेरी लावण्यास भाग पाडु नये. आशा स्वंयसेविकांच्या सेवा शर्तीनुसार, त्यांनी आठवडयातुन ४ दिवा २ ते ३ तास काम करावे, असे नियम आहे. त्यापैकी एक दिवस घरुन काम करण्याची त्यांना मुभदेण्यात आली आहे. त्यांच्या कामाच्या वेळा लवचिक असुन, विशिष्ट वेळी कामावर जाण्याचे, त्यांच्या बंधन नाही. त्यामुळे आशा स्वंयसेविकांना दररोज विशिष्ट वेळी विशिष्ट जागी हजेरीची सक्ती करण्यात येवु नये. सोलापुर, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयात (Asha Worker Morcha) आशा स्वंयसेविकांना पी.एच. टेस्ट करण्याचे काम सांगण येत आहे. ते थांबवावे.
गटप्रवर्तकांना आशा सुपरवायझर हे नाव देण्यात यावे. गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांचा कामावर असताना नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्यांच्या वार दहा लाख रुपये नुकसानभरपाई म्हणुन देण्यात यावे.नागरी भागात गटप्रवर्तकांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण प्रचंड आहे. म्हणुन २५ आशा स्वंयसेविका मागे एक गटप्रवर्तकांची नियुक्ती करावी. त्यानुसार (Asha Worker Morcha) गटप्रवर्तकांच्या नवीन जागा निर्माण करुन भरण्यात याव्यात. अशा मागण्या मंजुर करण्यात याव्यात याकरीता १० ऑक्टोंबर रोजी आझाद मैदान, मुंबई येथे सकाळी ११ पासुन भव्य मोर्चा व तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. या मोर्चामध्ये गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख व राज्य संघटक दत्ता देशमुख यांनी केले आहे.