स्वबळ, युती आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता!
रिसोड (Municipal Council Election) : गेल्या पावणेदोन वर्षेपासुन रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दिवाळीमध्ये होण्याची शक्यता आहे. रिसोड नगरपरिषदा च्या होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रवर्गनिहाय सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुका प्रमुख पक्षांकडून स्वबळावरच लढवल्या जातील की युती, आघाडी होईल, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.
निर्णय प्रक्रियेत महिलांचा प्रभाव निर्णायक ठरणार!
कुरघोडीचे राजकारण करण्यात पटाईत असलेले अनेक मातब्बर नेते व नेत्याकडून राजकारणाचे बाळकडू घेणारे भावी उमेदवार आहेत. त्यांच्या गटांकडून आता रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. कार्यक्रमानुसार, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसंख्येच्या (Population) आधारावर सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे रिसोड नगर परिषद मध्ये एक नगराध्यक्ष आणि 23 सदस्यां निवडून येणार आहेत. यापैकी 12 जागा महिलांसाठी राखीव या मध्ये सर्व साधारण 7 ओबीसींच्या 3 आणि 2 अनुसूचित जाती साठी राखीव ठेवण्यात आल्याने निर्णय प्रक्रियेत महिलांचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे.
निवडणुकांमध्ये सदस्यसंख्येत फेरबदल होण्याची शक्यता!
नगरपरिषदांमध्ये महिला उमेदवारांची संख्या जवळपास अर्ध्याहून अधिक असल्याने यंदाची निवडणूक महिला सक्षमीकरणाच्या (Women Empowerment) दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. ही सदस्यसंख्या २०११ च्या जनगणनेवर आधारित निश्चित करण्यात आली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 34 हजार 134 एकूण मतदार संख्या आहे. त्यामुळे गेल्या दशकभरातील लोकसंख्या वाढ व स्थलांतराचा मुद्दा यात समाविष्ट नाही. यामुळे पुढील निवडणुकांमध्ये सदस्यसंख्येत फेरबदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रिसोड नगरपरिषदेच्या (Risod Municipal Council) होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध केलीअसून. 31 ऑगस्ट ल हरकती व सूचना आल्या नंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे सद्यस्थित रिसोड नगरपरिषद निवडणूक साठी हालचाली गतिमान झाल्या असुन मातब्बर नेते सक्रिय झाले आहेत स्वबळ, युती आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये (Activists) उत्सुकता दिसत आहे.