हिंगोली (Muslim Samaj Morcha) : उतरप्रदेशातील कानपूर येथील रावतपुर पोलीस ठाण्यात दाखल खोटा गुन्हा परत घेऊन दोषी पोलीस अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी तहेरीक लब्बैक या रसुलअल्ला या धार्मिक संघटनेसह (Muslim Samaj Morcha) सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने २४ सप्टेंबर बुधवारी पेन्शपुरा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढुन त्यांच्यामार्फत राष्ट्रपती यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील कानपुर जिल्ह्यात सय्यद नगर येथील युवकांनी ईद साजरी करण्यासाठी मिरवणुकीत सहभागी असलेल्या लोकांसाठी पाणी व अल्पोहाराचे वाटप करीत होते सदर टेंटवर आय लव मोहम्मद असे फलक पोलीस प्रशासनाच्या पुर्व परवानगीने लावण्यात आले होते. काही पोलीस अधिकार्यानी परीसरातील समाज कंटकांशी संगणमत करुन (Muslim Samaj Morcha) मुस्लिम समाजातील युवका विरुध्द धार्मिक भावना दुखवली व गैरकायदेशीर मंडळ जमविने संदर्भात खोटा गुन्हा दाखल केला. यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्या व उलट मुस्लिम समाजातील युवका विरुध्द खोटा गुन्हा दाखल केला. तो गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर मौलाना नईम रजा, मौलाना शाहनवाज रजा, मौलाना शकील रजा, मौलाना अलिमोद्दीन रजवी, मौलाना अब्दुल मोबीन रजा, मौलाना मोहम्मद इलियास रजवी, मौलाना सादेक रजा, मौलाना रिजवान रजवी, मौलाना अब्दुल खदीर रजवी, मौलाना नुरुलुहसन रजवी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.