Nagpur Crime:- प्रेम हे प्रेम असते. त्याला वयाची मर्यादा नसते. मात्र येथे एकाच वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुला-मुलीत प्रेम फुलले. दोघेही प्रेमात आकांत बुडाले. दरम्यान प्रेयसीला इम्प्रेस (Impress)करण्यासाठी त्याने महागडा आयफोन (Iphone)द्यायचे ठरविले. यासाठी शक्कल लढविली आणि आपल्या भावाच्या मदतीने घरफोडी केली. यातून आलेले पैसे प्रेयसीवर उडविले. परंतु, प्रेयसीसाठी आयफोन घेणार, त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कळमना पोलिसांनी अवघ्या २४ तासातच घरफोडीचा छडा लावला आणि आरोपीला ताब्यात घेतले.
दोघेही अल्पवयीन, प्रेयसीवर उडविली चोरीची रकम
प्राप्त माहितीनुसार, दोघांचेही आई-वडील कळमना मार्केटमध्ये हमालीचे काम करतात. प्रेयसी मुलगी आणि आरोपी एकाच वस्तीत राहतात. त्यामुळे त्यांच्यात बोलचाल होत असे. यातून त्यांचे प्रेमसंबंध (love affair) निर्माण झाले. खेळण्या-बागडण्याच्या वयात शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत दोघेही प्रेमात पडले. ती नवव्या वर्गात शिकत असून मागील तीन वर्षांपासून त्यांच्यात हे नाते आहे. दोघेही तासंतास बोलत राहायचे. पण, अल्पवयीन असल्याने कुणाला संशय आला नाही. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करु लागला. अल्पवयीन प्रेमात ‘दिवाना’ झालेला प्रियकर ‘चांदतारे’ तोडून आणण्याचे स्वप्न तिलादाखवूलागला. दरम्यान, प्रियकराला प्रेयसीला आयफोन गिफ्ट म्हणून द्यायचा होता. म्हणून त्याने स्वतःच्या भावाची मदत घेण्याचे ठरवले. यासाठीतो सुद्धा तयार झाला. यानंतर दोघांनी कामनानगर येथे एका घरातून १ लाख ४४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. मोठी रक्कम हाती लागल्यानंतर त्याने प्रेयसीच्या खान्यापिण्यावर यातील काही रक्कम खर्चही केली.
घरातून १ लाख ४४ हजार रुपयांची रोकड लंपास
मात्र, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी घरफोडीचा छडा लावत दोन्ही विधिसंघर्षग्रस्त भावांना ताब्यात घेतले. दोघांचीही चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. एकाने भावासाठी तर दुसऱ्याने प्रेयसीसाठी चोरी केल्याचे सांगितले. अशाप्रकारे प्रेमात वेडापिसा झालेल्या अल्पवयीन प्रियकरास आता कायद्याच्या अडचणीतून जावे लागणार आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमातून प्रेयसी अनभिज्ञ होती. पोलिसांच्या कारवाईनंतर प्रियकराचा प्रताप तिच्या लक्षात आला. आणि तिने सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जाते.