Nanded :- मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली संपूर्ण मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी काढली आहे. हिगोलीमधून यांची सुरूवात झाली आहे. काल परभणीत ही रॅली(Rally) पार पडली आज नांदेडमध्ये ही रॅली निघणार आहे. मराठा समाजाला ओबीसी(OBC) मधून आरक्षण मिळावं आणि सगे – सोयऱ्याचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी अखंड मराठा समाजाच्यावतीने जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलयं आणि आज ही रॅली नांदेड शहरात निघणार आहे.
१२ वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत या रॅलीला होणार सुरूवात
शहरातील राजकार्नर येथून दुपारी १२ वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरूवात होणार आहे. यानिमित्तं शहरातील राजकार्नर, श्रीनगर, महात्मा फुले स्मारक, शिवाजी नगर, वजीराबाद चौक मार्गे शहरातील मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यापर्यंत शांतता रॅली काढली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जोरदार तयारी करण्यात आली आहे.छतपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत.