हॉटेल आस्वाद नजीकची घटना
नांदगाव पेठ (Nandgaon Peth Accident) : तिवसा तालुक्यातील गवाड गव्हाण येथील दाम्पत्य अमरावती येथे नातेवाईकांकडे जात असतांना अचानक दुचाकीचे संतुलन बिघडल्याने दुचाकी दुभाजकावर आढळून झालेल्या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आस्वाद नजीक घडली. प्रहार कार्यकर्त्यांनी तातडीने केलेल्या मदतीमुळे जखमींचे प्राण वाचले.
गवाड गव्हाण येथील गजानन चौधरी (५१) व सविता चौधरी (४५) हे दाम्पत्य सकाळी गावावरून दुचाकी क्र. एम.एच.३१,सी.झेड ४७२२ ने अमरावती येथे नातेवाईकांकडे जात असतांना हॉटेल आस्वाद जवळ दुचाकीचे संतुलन बिघडल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. यामध्ये दाम्पत्य गंभीर जखमी झाले. (Nandgaon Peth Accident) महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने रक्तस्त्राव सुद्धा खूप झाला. दरम्यान प्रहारचे रुग्णसेवक अभिजित बानासुरे आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्यांना उचलून तातडीने रुग्ण वाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. प्रहार कार्यकर्त्यांनी वेळीच दाखविलेल्या तत्परतेमुळे दोन्ही जखमींचे प्राण वाचले. (Nandgaon Peth Accident) दोन्ही जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.