बुलढाणा (National Sports Day) : आज शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला.
या (National Sports Day) कार्यक्रमात माझ्या हस्ते विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन देण्याबरोबरच तरुण पिढीत क्रीडाभिमुख संस्कार रुजवण्याचा संकल्प या सोहळ्यातून करण्यात आला.
या प्रसंगी शारदा ज्ञानपीठाचे (Sharda gyanpeeth) अध्यक्ष प्रमोदजी देशपांडे म्हणाले की, “शालेय जीवनात मृत्युंजय आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी असताना राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर कुस्ती, जलतरण, धावण्याच्या स्पर्धा आणि विविध मैदानी खेळांमध्ये प्राविण्य मिळवून विद्यालयाची मान उंचावली होती. आज राजकीय जीवनातही ते प्रत्येकाच्या मनामध्ये घर करताना दिसत आहेत, हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे.”
यावेळी त्या ठिकाणी युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड (sanjay gaikwad), उपजिल्हाधिकारी शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर, प्रशिक्षक श्री. चंद्रकांत ईलग, पोलीस निरीक्षक विकास तिडके, आंतरराष्ट्रीय खेळाडू मिहीर अपार, प्रथमेश जावकर, शारदा ज्ञानपीठ अध्यक्ष प्रमोदजी देशपांडे, योगेश परसे तसेच असंख्य खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.