मानोरा (Navratri festival) : येत्या २२ सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असुन १० दिवस चालणारा (Navratri festival) उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन दि. १८ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन आवारात पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले.
नवरात्र उत्सवात देवीची उपासना करत आरती, गरबा नृत्य, निबंध स्पर्धा, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम दहा दिवस राबविण्यात यावे. (Navratri festival) नवदुर्गोत्सवाचे विसर्जन डिजे मुक्त पारंपरिक वाद्यने करावे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याबाबतची सर्वांनी दखल घेण्याची सुचना ठाणेदार पोहेकर यांनी केली. यावेळी सार्वजनिक नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीला पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.