पर्जन्यमापक यंत्राचा वापर घातक
अनेक शेतकरी राहणार शासकीय मदतीपासून वंचित
दत्तात्रय भटकर
बार्शीटाकळी (Heavy Rain Crop Damage) : बार्शीटाकळी तालुक्यात 26 27 व 28 सप्टेंबरला मेघगर्जना व वेगवान वाऱ्यासह सार्वत्रिक स्वरूपाचा मुसळधार होतो. पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विविध प्रकारच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पावसाची नोंद करणारे पर्जन्यमापक यंत्रातील (Heavy Rain Crop Damage) माहितीचा आधार घेत, शेतकऱ्यांना मदत देण्याचे जे कार्य होत आहे. मुळात तेच घातक ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतकरीअनेक शासकीय मदतीपासून शेतकरी वंचित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षांपूर्वीबार्शीटाकळी तालुक्यात कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने, (Heavy Rain Crop Damage) तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकाबरोबरच मोठ्या प्रमाणात सलग सोयाबीन, सोयाबीन तूर सोयाबीन, सोयाबीन कपाशी, मुंग, उडीद,ज्वारी, बाजरी अशा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली.
नुकत्याच पडलेला मुसळधार पावसामुळेशेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वच (Heavy Rain Crop Damage) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच नदी नाल्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेत जमिनी पिकासह खरडून गेल्या आहेत, तर काही भागात शेतकऱ्यांच्या शेतात आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे निदर्शनास येत आहे.
पर्जन्यमापक यंत्राची आकडेवारी शासकीय मदत मिळण्यासाठी घातक
शासकीय मदत देण्यापूर्वी शासनाने तालुक्यातील सहा मंडळामध्येपर्जन्यमापक यंत्र बसविले आहेत. या यंत्राने घेतलेल्या नोंदीनुसार शासकीय मदत मिळण्यासाठी 65 मिलिमीटर पावसाची नोंद आवश्यक व बंधनकारक असते. कोणत्याही मंडळातपाच दिवस सतत दहा मिली किंवा त्यापेक्षा वर रोज सारखीच पावसाची नोंद असेल त्या भागात शासकीय मदत मिळू शकते अशा प्रकारचे शासनाचे निकष आहेत. परंतु या कालावधीत अशा प्रकारची नोंद पर्जन्यमापक यंत्राने घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून दिनांक 29 सप्टेंबरला प्रकाशित झालेल्या बातमी त्याची नोंद आहे. तालुक्यात सार्वत्रिक पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिका पिकांच्या मुळा सडल्यात, कपाशीच्या बोंबड्या काळया होऊन चढल्या, सोयाबीन पिका प्रमाणेच इतर पिके नष्ट झाली आहेत.
बार्शीटाकळी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आमचे प्रतिनिधी यांनी 29 सप्टेंबरला सेलू बुद्रुक परिसरात भेट देऊन पाहणी केली असता ,27 सप्टेंबरला या मंडळामध्येरात्री सुमारास पडलेल्याढगफुटी (Heavy Rain Crop Damage) सदृश्य पावसामुळेशेलू बुद्रक येथील शेतकरी मदन केशवराव काकड यांच्या कोयाळ नदी काठावर असलेल्या चार एकर शेतातील साडेतीन एकर शेतातील कपाशी पिकासह माती खरडून गेली आहे.तर या नदीकाठावर असलेल्या एका शेतकऱ्यांच्या कांदा चाळीमधील कांदे सुद्धा नष्ट झाले आहेत.
विशेष महत्त्वाचे असे की, अनंता भाऊराव महल्ले यांचे शेत मुख्य डांबरीकरण रस्त्याला लागून आहे यांच्या पाच एकर शेतातील चार एकर शेतात आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून सोयाबीन पीक पूर्ण नष्ट झाल्याचे विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. अशा प्रकारची गंभीर परिस्थिती अनेक भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची झाल्याचे निदर्शनास येते.
सोयाबीन पीकाला सद्यस्थितीपर्यंत पंधरा ते सोळा हजार रुपये एकरी खर्च आला असून कपाशी पिकाला 22 ते 23 हजार रुपये खर्च आला आहे. शेतातील पिके नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचा श्वास गुदमरतोय अशा प्रकारची गंभीर व विदारक परिस्थिती तालुक्यातील सर्वच गावातील कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे.
शासनाने पर्जन्यमापक यंत्राची आकडेवारी विचारत न घेता सर्व तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची आर्थिक मदत द्यावी. जेणेकरून शेतकरी जिवंत राहू शकतील. अन्यथा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एक एकरसाठी खर्च:
नांगरणी १४००
वखरणी ६००
रोटावेटर ९००
पेरणी. ६००
खत १४५०
बियाणे ३६००
तणनाशक १०००
फवारणी १५००
डवरणी १०००
निंदण १४००
इतर २०००
एकुण १५४५० रुपये
कपाशी एक एकरसाठी:
नांगरणी १४००
वखरणी ६००
रोटावेटर ९००
पेरणी मजुरी सरी काढणे ३००
पेरणी मजुरी बाया १२००
खत ४५००
बियाणे ३४००
निंदण तिन ४०००
डवरणी १२००
फवारणी ५०००
एकुण खर्च २२५००