गावकऱ्यांच्यावतीने सामूहिक सत्कार!
मानोरा (NEET Exam) : तालुक्यातील माहुली येथील अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील कु. किरण संतोष जाधव हिने नीट परीक्षेत (NEET Exam) घवघवीत यश संपादन केल्यामुळे दि. 17 जुन रोजी संत सेवालाल महाराज सभागृहात तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी किरणच्या पालकांचा सत्कार करण्यात आला!
कुटुंबातील शेतकरी संतोष जाधव यांच्याकडे 2 एकर शेती आहे. अत्यल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मुलगी कु. किरण संतोष जाधव हिने ऑनलाईन अभ्यास करून निट परीक्षेत 720 पैकी 554 गुण मिळविले आहे. त्यामुळे तिचा सत्कार संत सेवालाल महाराज संस्थान कमीटीकडून शाल, श्रीफळ, फुलाचे हार टाकुन मूळगावी माहुली येथे सामुहिकरीत्या सत्कार (Felicitation) आला. यावेळी किरणच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण घेतांना आलेल्या समस्या व अडचणी याविषयी किरण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमावेळी चंद्रकांत काजळे, गजानन डवले, भारत राठोड, श्रीकृष्ण राठोड, पंडीत राठोड, गोपाल राठोड, अमोल पवार, सुरेश जाधव, रमेश आडे, कैलास चव्हाण, नीतीन राठोड, अमोल महाराज पुजारी, जगदीश राठोड, विनोद राठोड, बंडु राठोड, संतोष जाधव आदीसह गावकरी (Villagers) मंडळीची उपस्थिती होती.