चारगाव येथील घटना, आरोपीचे आत्मसमर्पण
सावली (Agricultural Dispute) : शेतीच्या वादातून पुतण्याने आपल्या काकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना सावली पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या चारगाव येथे घडली. नरेश कृष्णा आडे (२७) असे जखमीचे नाव असून कुणाल अनिल आडे असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. जखमी झालेल्या काकावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी दोन आरोपीस अटक केली आहे.
सावली तालुक्यातील चारगाव येथील नरेश आडे हा एका लहान मुलाला गाडीवर बसवून डिझेल कॅन आणत असतांना टपून असलेल्या कुणाल अनिल आडे (२३) याने चारगाव नदीजवळ तलवारीने वार केला. यात नरेशच्या डोक्याला लागल्याने गंभीर जखमी झाला. सोबत असणारा लहान मुलगा गाडीवरून पडला व लगेच पुलाचे काम करणार्या मजुरांना हाक मारली. (Agricultural Dispute) मजूर घटनास्थळी येताच आरोपीने पळ काढला.
याबाबत सावली पोलिसांना कळविले असता आरोपीस अटक करण्यात आली आहे. शेतीच्या वाद असल्याने राग मनात आरोपीने हल्ला केल्याचे बोलल्या जात असून यापूर्वी आरोपीने अनेकांना मारण्याच्या धमक्या दिल्या असल्याचे बोलले गेले. आरोपी वर १०९ (१),३(५) कलम अन्नव्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. मात्र तालुक्यात केरोडा हत्या प्रकारना नंतर लगेच चारगाव येथे प्राणघातक हल्ला झाल्याणे कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.