Koregaon :- देसाईगंज तालूक्यातील कोरेगाव येथे 30 ऑगस्टला महादेव मस्के यांचे अध्यक्षेते खाली वन ग्रामसभा आयोजीत करण्यात आली यात मागील वर्षीचा अहवाल वाचवून देण्यात आला त्यात भ्रष्टाचार आढळून आल्याने शाम मस्के यांनी आक्षेप घेत वन समिती बरखास्त करून नविन वन समिती(Forest Committee) गठीत करण्याचा प्रस्ताव मांडला असता त्या प्रस्तावाला पाठींबा मिळाला परंतू जूनी वनसमीतीचे काही पदाधाधिकारी सभा तहकूब करून वेळ काढण्याच्या प्रयत्नात असल्याने सभेत गदारोळ निर्माण झाला.
परंतू त्याही परिस्थितीत नविन वन समीत गठीत करण्यात आली यात समीती अध्यक्ष ममीता आळे, उपाध्यक्ष धनपाल कोडापे, सचिव युवराज पिलारे, सदस्य रविन्द्र दाणे, प्रल्हाद लाडे, लंकेश नाकडे, चंदा सहारे, मनिषा सहारे, नाझिया शेख, योगिता आळे ही नवीन वन समिती गठीत करण्यात आली