औंढा नागनाथ (Tamti Tanda Gram Panchayat) : तालुक्यातील तामटी तांडा येथील ग्रामपंचायत सरपंचावर ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी दिनांक 24 जुलै गुरुवार रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे तहसीलदार हरीश गाडे यांच्या कडे अविश्वास ठरावासाठी प्रस्ताव दाखल केला आहे
तामटी तांडा ग्रामपंचायत (Tamti Tanda Gram Panchayat) मध्ये सात सदस्य असून तीन वर्षांपूर्वी सरपंचाची निवड करण्यात आली होती परंतु सहा ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच मनमानी करीत असून सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत,मासिक सभेत सदस्यांना अपमानास्पद वागणूक देतात, ग्रामपंचायत विकास कामाबाबत सदस्यांना माहिती देत नाहीत, ग्रामसभा, मासिक व इतर सभा वेळेवर घेत नाहीत असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
ठरावावर ग्रामपंचायतचे (Tamti Tanda Gram Panchayat) सदस्य तथा उपसरपंच सचिन रमेश जाधव, सदस्य कमल विष्णू जाधव ,शशिकला मंगुलाल राठोड ,उत्तम तुकाराम जाधव, शांताबाई बापूराव राठोड ,अशोक नागोराव जाधव या सहा सदस्याच्या स्वाक्षऱ्या असून आता पुढील कार्यवाही कडे लक्ष लागले आहे.