परभणी स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!
परभणी (Ganja Caught) : परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जालना रोडवरील मालेगाव तांडा पाटीजवळ गुरुवार १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास कारवाई करत अडीच किलो गांजा पकडला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी परभणीच्या जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल!
पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, पो.नि. विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. श्रीधर जगताप, धोंडगे, पोलिस अंमलदार सिध्देश्वर चाटे, विलास सातपुते, नामदेव डुबे, उमेश चव्हाण, मधुकर ढवळे, राम पौळ, संजय घुगे यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला मालेगाव तांडा पाटीजवळ एक इसम अवैधरित्या विक्री करण्यासाठी गांजा घेऊन असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी छापा (Police Raid) टाकत संबंधीताला ताब्यात घेतले. सदर इसमासोबत आणखी एक जण होता. पोलिसांनी त्यांच्या जवळून ५० हजार रुपये किंमतीचा अडीच किलो गांजा, दुचाकी मोबाईल मिळून १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सपोनि. श्रीधर जगताप यांच्या फिर्यादीवरुन गणेश शिंदे, योगेश राठोड या दोघांवर जिंतूर पोलिसात (Jintoor Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.