जि.प. राजकारणात कळमनुरी तालुक्याचे राहिले वर्चस्व
तिनदा अध्यक्ष दोनदा उपाध्यक्षपद
तिनदा अध्यक्ष दोनदा उपाध्यक्षपद
आखाडा बाळापूर (OBC Category) : मागील तिन चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता दिवाळीनंतर या वर्षे अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. निवडणूक करता निवडणूक विभाग व प्रशासन तयारी करत आहे दुसरीकडे ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाच्या या सताकेंद्र वर्चस्वासाठी इच्छुक मंडळी प्रमुख पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.नुकतीच राज्यातील ३२ जि.प.अध्यक्ष आरक्षण सुटले आहे. जिल्ह्यातील जि.प.आरक्षण तिसर्यांदा मागास प्रवर्गासाठी (OBC Category) ओबीसी करता राखीव ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पंचवीस वर्षात सर्वाधिक पाच वेळा महिलांना अध्यक्ष म्हणून संधी मिळाली यातील दोघी कळमनुरी तालुक्यातील व एक कळमनुरी मतदारसंघातील म्हणजे पाच पैकी तिन वेळा कळमनुरी वर्चस्व राहिले आहे. परभणी जिल्ह्यातून १९९९मध्ये हिंगोली विभाजन होउन जिल्हा परिषद स्थापना झाली.२००२मध्ये हिंगोली जिल्हा परिषद अस्तित्वात आली.
स्थापना झाली त्यावेळी पासून आता होणारी पाचवी निवडणूक आहे. जिल्हा परिषद पहिल्या निवडणूक अध्यक्ष उपाध्यक्ष होण्याचा मान कळमनुरी मतदारसंघास मिळाला होता यात अध्यक्ष म्हणून सुलोचना काळे (पिंपळदरी गट) व उपाध्यक्ष म्हणून डी. के.दुर्गे (आ.बाळापूर गट) यांनी काम पाहिले होते यानंतर आखाडा बाळापूर गटातील मिनाक्षी ताई बालाजी बोंढारे यांनी व त्यानंतर शेवाळा गटातील शिवराणी नरवाडे यांनी जि.प.अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
तर वारंगाफाटा गटातील राजेश्वर पतंगे यांनी जि.प.उपाध्यक्ष म्हणून तसेच तालुक्यातील आखाडा बाळापूर गटातील संजय पाटील बोंढारे यांनी शिक्षण व अर्थ सभापती म्हणून तर खरवड गटातून निवडून आलेल्या कै.राजीव सातव यांनी कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून तर सिंदगी गटातील मधुकर कुरूडे यांनी समाजकल्याण सभापती म्हणून व डोंगरकडा गटातील लक्ष्मीबाई भुजंगराव देसाई यांनी महिला व बालविकास सभापती म्हणून तर नांदापुर गटातील कै.डॉ. वसंतराव देशमुख यांनी शिक्षण सभापती म्हणून काम पाहिले होते.तर परभणी जिल्हा परिषद असताना तालुक्यातील रामराव वाघडव्ह यांनी समाज कल्याण सभापती म्हणून काम पाहिले होते. जिल्हा परिषद स्थापनेपासून कळमनुरी तालुक्याचा जिल्हा परिषद राजकारणात दबदबा राहिला आहे.५२ जिल्हा परिषद गट आहे कळमनुरी तालुक्यात ११ तर मतदारसंघात १८गट आहे. सध्या जि.प.गटात आरक्षण सोडतीकडे लक्ष ठेवून इच्छुक मोर्चेबांधणी करत आहेत.
बाळापूरचा ‘आखाडा’ वरचढ..
जिल्हा परिषद राजकारणात प्रमुख पक्षनेते पदाधिकारी असणार्या आखाडा बाळापूर गट राजकीयदृष्ट्या वरचढ राहत आला आहे. पहिल्या जि.प.उपाध्यक्ष निवडवेळी जि.प.प्रथम उपाध्यक्ष होण्याची संधी बाळापूर गटातील डी.के.दुर्गे यांना मिळाली होती नंतर पुढे याच गटातील मिनाक्षी बालाजी बोंढारे जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या आहेत तसेच संजय बोंढारे शिक्षण सभापती होते. येथील मोहनसिंह बयास यांनी पंचायत समिती सभापती म्हणून तर मोहम्मद जिया कुरैशी व चंद्रकांत डुकरे यांनी उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. बाळापूर लगतच्या शेवाळा येथील शिवराणी नरवाडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तर येथील कै.केशवराव सावंत, रावसाहेब सावंत,दोघांनी पंचायत समिती सभापती म्हणून तर अजय सावंत व प्रल्हाद सुर्यवंशी यांनी उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. शेवाळा व बाळापूर दोन्ही गट राजकीय समीकरण बघता महत्त्वाचे आहे.
आता नवीन राजकीय समीकरण
मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जवळपास आठ नउ वर्षापूर्वी झालेल्या आहेत. त्यावेळी राजकीय परिस्थिती नेतृत्व वेगळे होते. या मधल्या वर्षांत अनेक राजकीय घडामोडी घडून नवीन नेतृत्व आले प्रमुख पक्ष फुटुन दोन पक्ष झाले अनेक पदाधिकारी नेतेमंडळी पक्षातंर झाले अशा सगळ्या वातावरणात आता होणार्या (OBC Category) निवडणूका प्रमुख पक्ष नेतृत्व राजकीय कसोटीच्या ठरणार आहे हे लक्षात घेऊन नेते मंडळी पक्ष तयारी करत आहे.