ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
कळमनुरी (OBC Elgar Morcha) : कळमनुरी येथील विश्रामगृहावर दि.७ सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसींच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ओबीसी एल्गार मोर्चा (OBC Elgar Morcha) काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी संघर्ष योद्धे प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची व यापूर्वी कुणबींना दिलेल्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची तसेच न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करणे आदी मागण्यासाठी हा (OBC Elgar Morcha) एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवि शिंदे, सावता परिषद प्रदेश संघटक विठ्ठल गाभणे, जीवासेना प्रदेश सचिव उमेश गोरे,समता परिषद मराठवाडा सचिव डॉ.नागोराव जांबुतकर, जिल्हाध्यक्ष चंदू लाव्हाळे, सभापती मारोतराव खांडेकर, माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे,राजेंद्र शिखरे,ॲड.संतोष राठोड, दिनकर कोकरे,बालाजी देवकर,गफार कुरेशी, अशोक करे,अतुल बुर्से,आप्पाराव शिंदे ,केशवराव मस्के, वनीता गुंजकर, सुवर्णा गाभणे,प्रा.गजानन थोरात, डॉ.प्रकाशराव नाईक,शिवाजी शिंदे,डॉ.दिलीप मस्के, हाफिज फारूखी,निहाल कुरेशी,खाजा बागवान,शरद सुरोशे, तुकाराम मस्के,प्रकाश गिराम,सतीश लकडे,दिपक कापसे,गजानन मोरे,शंकरराव मुलगीर,भास्कर ढाले, साहेबराव मेटकर,राजू बावळे, दयानंद चट्टे, तुकाराम कवाने,दिलीप नरहरे ,प्रवीण राठोड, शिवराज घुगे, वैजनाथ चांदीवाले, कुबेर गोरे, राजू जाधव,साहेबराव मस्के,दत्ता गोरे, देवानंद मुलगीर,दिलीप मिरटकर ,प्रदीप मस्के, अनिल खांडेकर, प्रभू वडकुते, तुकाराम भूतनर,किसनबापू कोकरे ,शिवाजी शिखरे, सिताराम लकडे, गंगाराम वैद्य,सतीश तांबारे ,गजानन शिंदे ,रवि जाधव, प्रकाश साखरे, पुंजाराव वाघमारे, दिनाजी क्षीरसागर ,गणपत सातव,शामराव फटींग,डॉ.देवराव गोरे,दत्ता तास्के,विलास लकडे, बालासाहेब वैद्य यांच्यासह अनेक ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या (OBC Elgar Morcha) एल्गार मोर्चाद्वारे ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारांसाठी निर्णायक लढा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
