हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल!
हिंगोली (Offensive Post) : शिव प्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्या बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकुन बदनामी केल्याने हिंगोली शहर पोलिसात खानापूर चित्ता येथील एकावर गुन्हा नोंदविण्यात (Crime Record) आला.
पोलिसांनी कृष्णा पवार याला ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडे कारवाई!
हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील कृष्णा पवार या युवकाने त्याच्या फेसबुक अकाऊंट कृष्णा पवार यावरून शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकून त्यांची बदनामी केली. या संदर्भात शिव प्रतिष्ठाणचे हिंगोली (Shiva Institute Hingoli) जिल्हाध्यक्ष विजय तुळशीराम शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवर कृष्णा पवार याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने 18 जुलैला हिंगोली शहर पोलिसात विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा पवार (Krishna Pawar) याच्या विरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास शेख महम्मद हे करीत आहेत. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कृष्णा पवार याला तात्काळ ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडे (Local Crime Branch) पुढील कारवाईसाठी हजर केले.