हिंगोली (District General Hospital) : केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकारव्दारे हिंगोली जिल्हा भारतामध्ये आठवा आला असुन महाराष्ट्रात पहीला आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात १४ ऑगस्टला (District General Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकारव्दारे बालरोग विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोलीला महाराष्ट्र राज्यातील पहीला मुस्कान पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्कारासाठी नॅशनल हेल्थ अॅन्ड रिसोर्स सिस्टीम नवी दिल्ली व्दारा बालरोग विभाग, जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे २२ व २३ मे रोजी परिक्षण करण्यात आले होते. केंद्रीय पथकात डॉ. राज शिल्वम (तामिळनाडू) व डॉ. मैत्री कर्नाटकच्या पथकाव्दारे परिक्षण करण्यात आले होते. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत (District General Hospital) जिल्हा रुग्णालय, हिंगोलीला ९१.५० गुण मिळाल्यामुळे प्लॅटिनम सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा या पुरस्कारासाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व प्रतीवर्षी ८ लक्ष रुपये रोख पुरस्कारप्रमाणे ३ वर्षाचे २४ लक्ष रुपये पुरस्कार राशी मिळणार आहे.
पुरस्काराच्या या राशीमधील ५० टक्के रक्कम दरवर्षी विभागातील कर्मचार्याला प्रोत्साहनपर देण्यात येते व ५० टक्के रक्कम विभागासाठी वापरण्यात येते. केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे हिंगोली जिल्हा अशा प्रकारचा पुरस्कार मिळण्यासाठी हिंगोली जिल्हा भारतामध्ये ८ वा ठरला आहे व महाराष्ट्र राज्यामध्ये १ ला ठरला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालया च्या सभागृहात जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांच्या हस्ते डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. दिपक मोरे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. गोपाल शंकरराव कदम, बालरोग विभाग प्रमुख, जिल्हा रुग्णालय, हिंगोली, डॉक्टर स्नेहल नगरे यांना १४ ऑगस्ट रोजी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरावर त्यांचे व कौतुक व अभिनंदन होत आहे.




