म.रा.न.प.संवर्ग अधिकारी संघटना आक्रमक
हिंगोली (Old pension Yojana) : महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या मुलभूत प्रश्न व मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत नगर परिषद कर्मचार्यांनी २९ ऑगस्ट पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. महाराष्ट्र शासनाचे अधिकारी कर्मचार्यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनामार्फत जुनी पेन्शन योजना (Old pension Yojana) लागू करावी याकरीता २९ ऑगस्टपासून बेमुदत संपाला सुरूवात झाली आहे. नगर परिषद, नगर पंचायतमधील सन २००५ नंतरचे अधिकारी कर्मचार्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याकडे दुर्लक्ष
जुनी पेन्शन योजना (Old pension Yojana) बंद केली आहे. या दोन्ही कारणामुळे राज्य संवर्गातील जवळपास ३ हजार अधिकारी व स्थानिक आस्थापनेवरील ६ हजाराच्यावर कर्मचारी वर्गात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. हिंगोली न.प. कर्मचार्यांनी डी.पी.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत संप सुरू केला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव, जिल्हा सचिव उमेश हेंबाडे, तसनीम सनोबर, अनिकेत नाईक, एफ.ए.काझी, भागवत धायतडक, राजेश पदमने, वसंत पुतळे, नंदकिशोर डाखोरे, लिंबाजी कंधारकर आदी कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
अशा आहेत मागण्या…
क वर्गातील न.प.ला उपमुख्याधिकारी पद निर्माण करावे
नगर परिषद कर्मचार्यांच्या अनेक मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा चालढकल केली जात असल्याने २९ ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. क वर्गातील नगर परिषदांना उपमुख्याधिकारी पद हे निर्माण करावे, वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करावे, संगणक व विद्युत अभियांत्रिकी संवर्गाची पदे नगर पंचायतमध्ये निर्माण करावीत, आदी मागण्यांचा समावेश आहे.