Pusad :- महाराष्ट्र जलसंधारण परिषदेचे (Maharashtra Water Conservation Council)पूर्वाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister), भूतपूर्व राज्यपाल रसिकराज सुधाकरराव नाईक यांच्या ९१व्या जयंती निमित्त उद्या गुरूवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वा. श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा, पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने, पद्मश्री डॉ. अभय बंग(महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी, प्रथित यश लेखक व शोधग्राम (सर्च) चे संस्थापक गडचिरोली यांचे ‘या जीवनाचे काय करावे ?’
या विषयावर श्री शिवाजी विद्यालयाचे देवराव पाटील चोंढीकर सभागृह, येथे होणार्या व अंतर्मुख करायला लावणार्या या श्रवणीय संवाद स्वरूप व्याख्यानाचा लाभ सर्व रसिकवृंदानी अवश्य घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री डॉ. एन.पी. हिराणी अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ, शाखा-पुसद, कार्याध्यक्ष माजी आमदार विजय पाटील चोंढीकर,सचिव डॉ. ऊत्तम रूद्रवार, कोशाध्यक्ष दीपक आसेगांवकर व अनिरुद्ध पाटील अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद यांनी केले आहे.