Nagpur :- मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईत २९ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे. त्याविरोधात मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) मधून आरक्षण सरकारने देऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ३० ऑगस्ट पासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे याचे प्रमुख उपस्थितीत सुरू केले आहे. दुसर्या दिवशीही उपोषण सुरूच होते.
विविध संघटनांचा मिळत आहे पाठींबा
यापूर्वी २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण दिले जाणार नाही असे लिखित दिले होते. पुन्हा एकदा शासनाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नाही असे लिखित देऊन महासंघाला आश्वस्त करावे तोपर्यंत महासंघाचे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. आज ३० ऑगस्ट रोजी संविधान चौकात सुरू झालेल्या साखळी उपोषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नामदेवराव भुयारकर, राजाभाऊ चिलाटे, गणेश नाखले,राजेंद्र काकडे, वसंतराव राऊत, हेमंत गावंडे, केशव शास्त्री, लहू राक्षे हिंगोली, चंद्रकांत हिंगे, राजू गोस्वामी, रंगराव गेचोडे इत्यादींचा सहभाग आहे.
आज या साखळी उपोषणाला आ.अभिजीत वंजारी (Abhijit Wanjari), आ. प्रवीण दटके(Pravin Datke), गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खा. अशोक नेते, माजी नगरसेवक रमेश भुरसे, प्रकाश गेडाम, माजी नगरसेवक रमेश शिंगारे, गडचिरोली जिल्ह्याचे सहकार नेते प्रकाश सा. पोरेड्डीवार, प्राचार्य अशोक जीवतोडे, बबलू कटरे, वीरेंद्र गोतमारे,प्राचार्य चिकटे , विकास गौर, शंकर मौलिया, सतीश इटकेलवार , माजी नगरसेवक नाना झोडे , भरतराव केंद्रे बीड, गडचिरोलीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष तथा ओबीसी नेते प्रशांत वाघरे, भास्कर बुरे, अनिल पोहनकर, रत्नदीप म्हशाखेत्री, गणेश दहेलकर, भाविक आभारे, शेषराव कोहळे, आकाश सातपुते, विलास भांडेकर वडसा येथील महेश झरकर , सुनिल पारधी, वसंतराव दोनाडकर हिरालाल शेंडे, कैलास पारधी, रोशन ठाकरे, नेताजी तुपट, शंकर पारधी, दीपक प्रधान, गोपाल दरवे, आदित्य मिसार, अॅड राजू शेंडे, विजय आगलावे, सतीश तांबे, तुकाराम धोबे, एडवोकेट अभिजीत जीकार, दिगंबर चौधरी, मटाले आदीनी उपोषण मंडपाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या उपोषणाला तिरळे कुणबी समाज, तेली समाज संघटना, ओबीसी संघर्ष समिती गोंदिया, ओबीसी समाज संघटना नागभिड, रिपब्लिकन आठवले गटाने पाठिंबा दिला आहे.