चंद्रपूर (Chandrapur) :- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थ एम डी (Mephedrone drugs) विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी छापा टाकत ९.०४० ग्रॅम ड्रग्स जप्त करीत आरोपीला ताब्यात घेत एकूण १,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एकूण १,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे पोउप निरीक्षक संदीप बच्छिरे हे दि. १५ मे २०२५ रोजी डी.बी. स्टॉफसह पो.स्टे. परिसरात पेट्रोलींगकरित (Patrolling) असता माहिती मिळाली की, शासकीय डि.एड. कॉलेज ग्रॉउंड बाबुपेठ वार्ड येथे एक इसम एम.डि. ड्रग्स पॉवडर विक्री करिता घेउन येणार आहे, अशा खात्रीशीर माहितीवरून पो.नि. प्रभावती एकुरके यांना सोबत घेत पोलीस कर्मचारी, पंच, वजन मापधारक, फोटोग्राफरसह असे मिळुन मिळालेल्या माहितीप्रमाणे घटनास्थळी कारवाई करीता पोहचले असता, एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असता मिळून आल्याने त्यास ताब्यात घेउन त्याची पंचासमक्ष कायदेशीररित्या अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टचे खिशात दोन लहान प्लॉस्टीक पिशवीत एम.डि. पॉवडर ९.०४० ग्रॅम वजन असलेला किंमत ४५ रुपये, आरोपीची एक निळ्या रंगाची मोपेड गाडी सुझुकी एसेस एम.एच. ३४ सि.इ. ७१९५ किंमत ७० हजार रुपये असा एकूण १ लाख,१५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी महेश सुबोध बाला (२४ ) रा. जुनोना चौक, बाबुपेठ वार्ड चंद्रपूर हा पांढरा रंगाचा एम. डी. ड्रग्स पावडर ताब्यात बाळगुन स्वतःचे अर्थिक फायद्याककरिता विक्री करित असताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द गुन्हा नोंद करून तपासात घेतला.