परभणीतील जिंतूर – जालना रोडवर अपघात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल…!
परभणी (Bike Accident) : जिंतूर येथे भरधाव वेगातील दुचाकी चालकाने पाठीमागुन जोराची धडक दिल्याने ५० वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. सदर इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवार ८ जून रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास जखमीचा मृत्यू झाला. (Bike Accident) अपघाती मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल मणियार यांनी तक्रार दिली आहे. ७ जुनला दुपारी तीनच्या सुमारास जिंतूर – जालना रोडवर एका दुचाकी चालकाने फिर्यादीचे वडिल महेबुब हबीब सहाब मणियार वय ५० वर्ष, यांना पाठीमागुन जोराची धडक दिली. (Bike Accident) जखमीला उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून परभणीला आणि पुढे नांदेडला नेण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान महेबुब हबीब सहाब मणियार यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी एम.एच. २२ जे. २५६६ या क्रमांकाच्या दुचाकी चालकावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




