Risod Accident :- दि. 29 जून रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर येथील रिसोड फाटा परिसरात उभे असलेल्या मालवाहक ट्रकवर दुचाकी स्वार धडकल्याने त्यामध्ये ओम बाळूराम बहिरे वय 19 वर्ष या तरुणाचा जागेवरच मृत्यू (Death) झाला आहे. तर कार्तिक विलास कव्हर हा गंभीर जखमी झाला आहे.
मालवाहक ट्रकवर दुचाकी स्वार धडकल्याने तरुणाचा जागेवरच मृत्यू
दिनांक 29 रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या दरम्यान हे दोन्ही तरुण मालेगाव कडून शिरपूर कडे दुचाकी क्रमांक MH 37 Q1276 वर बसून येत होते .दरम्यान मालवाहू ट्रक क्रमांक MH27BX 80 17 हा ट्रक रिसोड फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर उभा होता ट्रकचालक ट्रक उभा करून नजीकच्या धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सदर दुचाकी स्वार ट्रकच्या पाठीमागच्या भागाला वेगाने येऊन धडकला सदर धडक एवढी जबरदस्त होती की सदर ट्रकचा अँगल पुरेपूर वाकल्या गेला. या अपघातामध्ये (Accident) ओम बाळू राम बहिरे व 19 वर्ष राहणार वाघी बुद्रुक हा या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. कार्तिक विलास कव्हर रा. वाघी बुद्रुक हा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचार करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आरटीओ वाशिम यांनी घटनास्थळाला भेट दिली. सदर अपघाताचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.