आकोली (Bolero Accident) : बोलेरो वाहनाचा टायर फुटल्याने अनियंत्रीत वाहन उलटल्याने घडलेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीररीत्या जखमी झाले. हा (Bolero Accident) अपघात २२ एप्रिल रोजी सकाळी येळाकेळी ते सुकळी (बाई) दरम्यान घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा आर्वी मार्गावर सुकळी बाई ते येळाकेळी दरम्यान बोलेरो कॅम्पर (क्रमांक एम. एच ३२ क्यू२१४२) मध्ये कामगार घेऊन जात होते. दरम्यान गाडीच्या मागच्या भागाचा टायर फुटल्यामुळे भरधाव गाडी अनियंत्रित होऊन रोडवरून प्रदीप बंडवाल यांच्या शेतात जाऊन १०० मीटरच्या अंतरावर उलटली. (Bolero Accident) अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले तर गणेश ज्ञानेश्वर मेश्राम यांचा जागेवरच मृत्यू झाला. चौघेजण देवळी येथील रहिवासी असून देवळी येथून तामसवाडा येथे कंत्राटदाराच्या कन्स्ट्रक्शन कामासाठी जात होते.
दरम्यान सुकळी व येळाकेळीच्या दरम्यान अपघात घडला. (Bolero Accident) अपघाताची माहिती सावंगी पोलीस स्टेशनला देण्यात आली. हेड कॉन्स्टेबल वीरेंद्र कांबळे, सहकारी अनुप गोपनारायण यांनी मोक्क्यावर चौकशी केली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मृतकास शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.