Yawatmal :- तालुक्यातील चिंचाळा येथील रोजगार हमीचा रस्ता फोडून पाण्याचा प्रवाह बदलवीत शेतकर्याच्या शेतात पाणी घुसवल्याने शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले आहेत. याबाबत पीडित शेतमालकाने तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी मारेगाव यांचेकडे तक्रार केली आहेत.
शेतकर्यांचे नुकसान : तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार
चिंचाळा येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत १८ लाख रुपये खर्च करून पांदण रस्त्याचे काम करण्यात आले होते. तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे उत्तर दक्षिण असलेल्या नालीला मुरूम टाकून बंद करीत नव्याने निर्माण केलेल्या पांदन रस्ताला फोडून नाली पश्चिम दिशेला काढली. यामुळे सततच्या येणार्या पावसाच्या पाण्याने लक्ष्मण राजगडकर यांचे मालकीचे सर्वे नंबर १३९ या शेतात पाणी घुसल्याने ठेक्याने दिलेल्या शेतातील पीक खरडून नेले. त्यामुळे शेतकर्यांचे (Farmers) फार नुकसान झाले आहे. तेव्हा बुद्धिपूरस्सर रस्ता फोडणार्या इसमावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतमालक लक्ष्मण राजगडकर यांनी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी मारेगाव यांना तक्रारी निवेदनातून केली आहे.