बार्शीटाकळी (Barshitakali Encroachment) : बार्शीटाकळीतील एका भूखंडाची जी फॉर्म वआखीव पत्रिकेवरील नोंद रद्द करून अनधिकृत अतिक्रम काढण्यात यावे. अशा प्रकारचे आदेश उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी (Barshitakali Encroachment) बार्शीटाकळीचे तहसीलदार व जिल्हा तथा तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुर्तीजापुर चे उपविभागीय महसूल अधिकारी संदीप अपार यांनी बार्शीटाकळीतील सीट नंबर चार, भूखंड क्रमांक 317 मधील 17 63 शेत्र 42.65 चौ. अनुभव खाजगी हिताकरिता नियमबाह्य बांधकाम व मिळकत पत्रिकेची चौकशी करून झालेले काम तात्काळ रद्द करण्यात यावे, असे आदेश एका तक्रारीनुसारदिनांक 14 ऑगस्टला बार्शीटाकळी चे तहसीलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अकोला व तालुका अधीक्षक भूमी अभिलेख बार्शीटाकळी यांना दिले असून त्याची माहिती जिल्हाधिकारी अकोला यांना दिली आहे.
सदर आदेशात कब्जेधारक अनधिकृत असल्याचे घोषित करण्यात आले असून भूखंडाचा जी. फॉर्म वआखीव पत्रिकेवरील नोंद रद करून अनधिकृत अतिक्रमण (Barshitakali Encroachment) कलम 50 अन्वये काढण्यात येऊन सदर भूखंड शासन जमा करण्यात यावा. असे सदर आदेशात नमूद केले आहे.




