कामठीत सामूहिक शिवतांडव स्तोत्र वाचन
देशोन्नती वृत्तसंकलन
कामठी (Mohan Bhagwat) : प्रत्येकाने भगवान शंकराची आराधना केली तर मनुष्याला यशाचा मार्ग प्राप्त होऊन त्याचे सर्वांगीण कल्याण होत असते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले. कामठी येथील शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने श्रीक्षेत्र महादेव घाट, कन्हान नदी तिरावर आयोजित सामूहिक शिवतांडव स्तोत्र वाचन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव लम्ब्यलम्बितां भुजंगतुंग मालिकाम्।
डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव: शिवम्।।
🔱 नागपूर येथे शिव तांडव स्तोत्र पठण करण्याचे भाग्य लाभले. कणाकणात शिव तत्त्व असून या स्तोत्राच्या पठणाने नेहमीच स्फुरण मिळते!… pic.twitter.com/QuAMWuRmoR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 31, 2025
कार्यक्रमाची सुरुवात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचे हस्ते दीप प्रज्वलन, भगवान शंकर व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), श्रीमंत राजे मुधोजी भोसले, राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, माजी आमदार टेकचंद सावरकर आदी उपस्थित होते. मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन भगवान शंकराची पावित्रता, पूजा, आराधना, भक्ती करून सदैव प्रयत्नशील असले पाहिजे. यामुळे मनुष्याला यश प्राप्त होऊन त्याचे सर्वांगीण कल्याण होत असते.
शिव तांडव स्तोत्राचे उच्चारण केल्याने स्फुरण येते…
शिव तांडव स्तोत्र का जाप करने से स्फूर्ति मिलती है…
(शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रम | नागपूर | 31-3-2025)#Maharashtra #Nagpur #ShivTandavStotra pic.twitter.com/Ja36uS9Uvj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 31, 2025
नागरिकांनी शिवस्त्रोत नेहमीच पठण करीत राहावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, शिवराज्य प्रतिष्ठानचे फार महत्त्वाचे समाजकार्य आहे. आज आयोजित सामूहिक शिवतांडव स्तोत्र वाचन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाने भगवान शंकराची आराधना करून सृष्टीवरील मानवी जीवनाच्या कल्याणासाठी सदैव कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कामठी येथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवतांडव स्तोत्र वाचन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मोहन भागवत यांनी आयोजकांचे अभिनंदन केले व नेहमीच अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे (Mohan Bhagwat) सांगितले.
या कार्यक्रमात ४ हजारांवर नागरिकांनी सामूहिक स्तोत्र वाचन करून त्यानंतर महाआरती केली. महाप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी केले. संचालन अनुष्का शर्मा यांनी तर आभार पंकज नारंदेलवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनिल देशमुख, चंद्रशेखर तुपट, अक्षय कनोजिया, स्वप्नील रथकंटीवार, नकुल ढोक आदींनी परिश्रम घेतले.