Parbhani :- विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections)जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची मागणी करत किसान ब्रिगेडच्या (Kisan Brigade) वतीने पाथरी तालुक्यातील विविध गावांतील ९९ शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी अर्ज सादर केले.
निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून त्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करावे
फुलारवाडी, कानसुर, बाबूलतार, बाभळगाव, उमरा, अंधापुरी, पाथरी, बोरगव्हाण, बांदरवाडा आणि रेनापूर आदी गावांतील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीची मागणी करत अर्ज भरून दिले. हे सर्व अर्ज सोमवार १९ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापूराव कोल्हे, शेतकरी नेते भागवतराव कोल्हे तसेच देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी गजानन घुंबरे उपस्थित होते. प्रशासनाकडून सहाय्यक महसूल अधिकारी भिसे यांनी हे अर्ज स्वीकारले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून त्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करावे. या अर्जांच्या माध्यमातून प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.