अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’
नवी दिल्ली (Ashok Saraf) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने (Padma Award) सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
President Droupadi Murmu presents Padma Shri in the field of Art to Shri Ashok Laxman Saraf. He is a legendary Indian actor, comedian, and producer known for his remarkable contribution to Marathi and Hindi cinema. Over five decades, he has entertained audiences with his… pic.twitter.com/jArGWKLgMS
— President of India (@rashtrapatibhvn) May 27, 2025
या (Padma Award) पुरस्कार समारंभात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी (Padma Award) ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर), अशोक सराफ (Ashok Saraf), अच्युत पालव , अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी (Dr. Vilas Dangre) डॉ. विलास डांगरे यांना (Padma Award) पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
View this post on Instagram
अशोक सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार (Padma Award) प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘धुमधडाका‘, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी‘ आणि ‘पंढरीची वारी‘ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर केले आहेत. अशोक सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय ठरला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असून, तो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. विलास डांगरे (Dr. Vilas Dangre) यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Award) सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परीक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ओळखले जातात. नागपूरमधील त्यांचे क्लिनिक गरजू रुग्णांसाठी आश्रयस्थान ठरले असून त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना उपचार दिले आहेत. 10 वर्षापासून ते दिव्यांग-दृष्टीहीन झाले आहेत. तथापि, त्यावरही मात करत ते आपली अमूल्य सेवा रुग्णांना देत आहेत.
#WATCH | Delhi: On being conferred with the Padma Shri, actor Ashok Laxman Saraf says, "It is a matter of great happiness and this honour means a lot to me. This award is a high honour. I am glad that I was considered for this award, it means that I have actually done something… pic.twitter.com/iPXZbkn4x5
— ANI (@ANI) May 27, 2025
पहिल्या टप्पयात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये (Padma Award) मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3 पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कार (Padma Award) यादीत एकूण 139 मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.